Thursday, September 19, 2024

सोनिया गांधींची जागा घेण्याआधी मल्लिकार्जुन खरगेंचं मोठं वक्तव्य

Uncategorizedसोनिया गांधींची जागा घेण्याआधी मल्लिकार्जुन खरगेंचं मोठं वक्तव्य

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. काँग्रेस नेते शशी थरूर यांचा पराभव करत खरगेंची बुधवारी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली.

सूत्रांच्या माहितीनुसार खरगे 26 ऑक्टोबर रोजी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारू शकतात. तर खरगेंच्या विजयाने तब्बल 24 वर्षांनी गांधी कुटुंबाबाहेरील नेता काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष बनला आहे.

सोनिया गांधींची जागा घेण्यापूर्वी खरगेंनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. संघटना मजबूत करण्यासाठी पक्षाचा सच्चा सैनिक म्हणून काम करणार असल्याचं खरगे म्हणाले. तर पक्षात कोणीही लहान मोठं नसल्याचंही खरगे यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता समान आहे. लोकशाही आणि संविधानाला धोका निर्माण करणाऱ्या फॅसिस्ट शक्तिंविरोधात लढा देण्यासाठी सर्वांना एकजूट व्हावं लागेल, असंही मल्लिकार्जून खरगे म्हणाले आहेत.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles