Friday, December 6, 2024

उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये, शिंदे गटाला मोठा झटका

maharashtraउद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये, शिंदे गटाला मोठा झटका

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केलं आणि त्यांच्यासोबत 40 आमदारांचा गटही फुटला. आमदारांपाठोपाठ अनेक खासदार, आजी-माजी नगरसेवक आणि कार्यकर्तेही शिंदेंना जाऊन मिळाले आणि उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात मोठं इनकमिंग चालू असतानाच आता उद्धव ठाकरेंनी देखील शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी शेकडो कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत देशमुखांनी हाती शिवबंधन बांधलं आहे.

संजय देशमुख हे शिंदे गटातील मंत्री संजय राठोड यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. त्यामुळे राठोडांना शह देण्यासाठी संजय देशमुख उद्धव ठाकरेंसाठी महत्त्वाचे ठरू शकतात.

दरम्यान, संजय देशमुखांच्या पक्षप्रवेशावर उद्धव ठाकरेंनीही प्रतिक्रिया दिली आहे. ज्यावेळी शिवसेनेवर आघात झाले तेव्हा शिवसेना दसपटीने मोठी झाल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles