जे बरोजगार आहेत आणि जे सध्या रोजगाराच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी एक मोठी खुशखबर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात हजोरा नोकऱ्यांची घोषणा करत रोजगाराच्या शोधात असलेल्यांची दिवाळी गोड केली आहे.
मोदींनी देशभरात मंत्रालय आणि सरकारी खात्यामध्ये एकूण 75 हजार नोकऱ्यांची घोषणा केली आहे. त्यानुसार गृह मंत्रालय, पोस्ट विभाग, रेल्वे मंत्रालय तसेच संरक्षण मंत्रालय, कामगार आणि रोजगार मंत्रालय या विभागात नोकऱ्या जाहीर केल्या जातील.
गट अ, गट ब (राजपत्रित) गट ब (बिगर राजपत्रित) आणि गट क अशा तिन्ही गटांमध्ये ही भरती होणार आहे. आयकर, साहाय्यकर,संरक्षण दल, उपनिरिक्षक, हवालदार अशा पदांसाठी ही भरती होणार आहे.
दरम्यान, ही पदभरती यूपीएससी बोर्ड, मंत्रालय, एएसी, रेल्वे रिक्रूव्हमेंट बोर्ड इत्यादी संस्थांमार्फत घेण्याची शक्यता आहे. त्यामुळं तरूणांसाठी नोकरी मिळवण्याची ही एक चांगली संधी आहे.