Thursday, November 21, 2024

इस्त्रोचे ‘बाहुबली’ रॉकेट लॉंच करणार ३६ सॅटेलाईट उपग्रह; रात्री १२ वाजता सुरू होणार काउंटडाऊन

maharashtraइस्त्रोचे ‘बाहुबली’ रॉकेट लॉंच करणार ३६ सॅटेलाईट उपग्रह; रात्री १२ वाजता सुरू होणार काउंटडाऊन

इस्त्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संस्था नव्या मिशनसाठी सज्ज झाली आहे. या मिशनचे नाव LVM3 M2/OneWeb India 1 असे आहे. २२ ऑक्टोबरच्या मध्यरात्री आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटी येथून बाहुबली रॉकेट लॉंच करण्यात येणार आहे. मध्यरात्री १२ वाजून ७ मिनिटांनी हे रॉकेट उड्डाण करेल. या बाहुबली रॉकेटमधून ३६ सॅटेलाईट उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात येईल.

या मिशनद्वारे ब्रिटीश स्टार्टअप कंपनी वनवेबचे ३६ सॅटेलाईट उपग्रहांचे लॉंच करण्यात येतील. उपग्रहांना कॅप्सुलमध्ये बसवण्यात आले आहे. रॉकेट लॉंच करण्याची अंतिम तपासमी सुरू असून LVM3 हे इस्त्रोचे सर्वात वजनदार रॉकेट आहे त्यामुळे या रॉकेट बाहुबली असे म्हटले जाते. पहिल्यांदाच या रॉकेटचा वापर व्यावसायिक प्रक्षेपणासाठी करण्यात येणार आहे.

वनवेब ही ब्रिटीश सॅटेलाईट कंपनी आहे. वनवेब सॅटेलाईट उपग्रहांच्या लॉंचसह इस्त्रो ग्लोबल कमर्शिअल लॉंच मार्केटमध्ये प्रवेश करेल. इस्त्रोने या उपग्रहाचे प्रक्षेपण पाहण्यासाठी लोकांसाठी व्ह्यूइंग गॅलरी देखील खुली केली आहे. कोरोनानंतर नागरिकांना रॉकेट पाहण्याची संधी मिळणार आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles