Thursday, January 16, 2025

मध्य प्रदेशात भीषण अपघात; १४ जणांचा मृत्यू तर ४० जण जखमी

maharashtraमध्य प्रदेशात भीषण अपघात; १४ जणांचा मृत्यू तर ४० जण जखमी

मध्य प्रदेशात रिवामध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये १४ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघाताबाबत माहिती मिळताच स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. मध्य प्रदेशातील रीवाजवळील राष्ट्रीय महामार्ग ३० वर एका खासगी बसला हा अपघात झाला.

ही खासगी बस हैदराबादहून गोरखपूरला जात बोती. रात्री ११.३० वाजता च्या सुमारास रिवाजवळ हा अपघात झाला आहे. बसमधील सर्व प्रवासी कामगार होते. दिवाळी साजरी करण्यासाठी हे कामगार आपल्या घरी जात होते. घटनास्थळी स्थानिकांकडून आणि पोलिसांच्या पथकाकडून बचावकार्य सुरू आहे.

अपघाताचे नेमके कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक माहितीनुसार समोरून येणाऱ्या दुसऱ्या वाहनाशी या बसची धडक झाली होती. अपघातात अनेक जण गंभीर जखमी असून त्यांना रूग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले जात आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles