कोरोना काळात रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटांच्या दरात वाढ करण्यात आली होती. यानंतर आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे स्थानकातील वाढती गर्दी पाहून मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटाच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. ही वाढ मोजक्याच स्थानकात आणि तात्पुरत्या स्वरूपाची असेल अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. २२ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत ५० रुपये करण्यात आली आहे असेही मध्य रेल्वेने ट्वीट करत स्पष्ट केले आहे.