गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना काही महिन्यांपूर्वी ईडीनं ताब्यात घेतलं होतं. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. राऊत जेलमधून कधी बाहेर येणार, याची शिवसैनिक वाट पाहत आहेत. परंतु पुन्हा एकदा शिवसैनिक नारज झाले आहे, कारण राऊतांचा कोठडीतला मुक्काम वाढवण्यात आला आहे.
शुक्रवारी राऊतांना PMLA न्यायालयात सुनावणीसाठी हजर केले होते. यावेळी त्यांच्या जामीन अर्जावरील आणि नियमित सुनावणी एकाचवेळी सुरू झाली. राऊतांकडून त्यांचे वकील अशोक मुंदरंगी यांनी काही लेखी मुद्दे सादर केले, तर ईडीकडून साॅलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तिवाद केला.
न्यायाधीशांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या निरिक्षणाखाली आहे. या प्रकरणात मी आधीच स्पष्टीकरण दिलं आहे. प्रविण राऊतांच्या जामीन अर्जावर या आधीच निर्णय झाल्याचं सांगत, राऊतांचा अर्ज फेटाळला.
दरम्यान, संजय राऊत हे कोर्टात माध्यमांसोबत बोलत असल्याची तक्रार पोलिसांनी न्यायाधीशांकडं केली होती. परंतु याबाबत ईडीला काही अडचण नाही असं म्हणत, न्यायाधीशांनी पोलिसांनाच सुनावलं.