Tuesday, October 1, 2024

जयंत पाटील भाजपमध्ये येतील?; गोपिचंद पडळकरांचे भाकीत

maharashtraजयंत पाटील भाजपमध्ये येतील?; गोपिचंद पडळकरांचे भाकीत

राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते भाजपच्या गळाला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस देखील थोडीशी अस्वस्थ दिसत आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या नेत्यांमध्ये विविध चर्चा आहेत. त्यातच भाजप नेते गोपिचंद पडळकरांनी जयंत पाटील भाजपमध्ये येतील, असं भाकीत करुन खळबळ उडवून दिलीये.

भाजपचे विधान परिषद आमदार गोपिचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात मोठे राजकीय वाद आहेत.

मागील आठवड्यात गोपिचंद पडळकर यांनी एक भाकीत केलं होतं. काही दिवसांत जयंत पाटलांच्या घरावर देखील भाजपचा झेंडा असेल, असं पडळकर म्हणाले होते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक आमदार भाजपच्या वाटेवर आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या मुंबई आणि बारामती कार्यालयावर देखील भाजपचाच ध्वज असेल, असं देखील पडळकरांनी म्हटलं होतं.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles