Thursday, September 19, 2024

ऋतुराज गायकवाडसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर सायलीचा मोठा खुलासा!

maharashtraऋतुराज गायकवाडसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर सायलीचा मोठा खुलासा!

अभिनेत्री सायली संजीव तिच्या उत्तम अभिनयाने आणि सौंदर्याने कायम चर्चेत असते. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेमधून ती घराघरात पोहोचली. सायलीने अनेक चित्रपटात आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

नुकतंच झी मराठी या वाहिनीवर सुरु झालेल्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात अभिनेत्री सायलीला अमंत्रीत केलं होतं. या वेळेस सायलीने तिच्या रिलेशनशिपबद्दल सांगितलं. ती म्हणाली की, ‘काहे दिया परदेस’ ही मालिका सुरु असताना माझं नाव सहकलाकार रिषी सक्सेना याच्यासोबत जुळवलं होतं. पण तस काहीच नव्हतं.

चेन्नई सुपर किंगजा ऋतुराज गायकवाड याच्यासोबत पण माझ्याबद्दल चर्चेचा चालू होत्या. पण तो माझा एक चांगला मित्र आहे. यावेळेस या कार्यक्रमात सायलीसोबत अभिनेता शरद केळकरही सहभागी झाला होता.

सायलीला ऋतुराजबद्दलचा प्रश्न विचारल्यानंतर शरदने तिची गंमत केली. तो म्हणाला की, ‘जर तो तुझा मित्र असेल तर प्लीझ मला त्याच्याकडून एक बॅट हवी हा… माझ्यासाठी एक बॅट मागून घे’ असं तिला गमतीत म्हणाला. तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सायली सध्या हर हर माहादेव या आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles