सध्या बिग बाॅस चा 16 वा सीजन चांगलाच चर्चेत आहे. त्यातच आता बाॅलिवूडचा भाईजान आणि बिग बाॅसचा होस्ट सलमान खानला एका आजारानं ग्रासल्याची माहिती समोर आली आहे.
सलमान खानला डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे त्याचे चाहते प्रचंड नाराज झाले आहे. तसेच सलमान लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना देखील करत आहेत.
सलमानला डेंग्यू झाल्यानं, तो पुढील काही दिवस बिग बाॅसमध्ये दिसणार आहेत. त्यामुंळ हा शो आता करण जोहर होस्ट करणार आहे. काहीजण हा शो फक्त सलमानसाठी पाहत असल्यानं, चाहत्यांना प्रचंड दु:ख झालं आहे.
दरम्यान, या शोमध्ये सलमान नसल्यानं, या शोचा टीआरपी कमी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच करण जोहर या शोमध्ये आपली जादू दाखवू शकेल का, हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे