Tuesday, July 23, 2024

सिद्धू मूसेवाला प्रकरणी बिग बॉसमधील ‘या’ स्पर्धकाची कसून चौकशी

maharashtraसिद्धू मूसेवाला प्रकरणी बिग बॉसमधील ‘या’ स्पर्धकाची कसून चौकशी

पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येमुळे संपूर्ण देशातच खळबळ उडाली. सिद्धू मूसेवालाच्या हत्येप्रकरणी अनेक महत्त्वाचे अपडेट समोर आले.

सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी आता आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली असून बिग बॉस १५ मधील एका स्पर्धकाची सध्या कसून चौकशी केली जात आहे. बिग बॉस १५ मधील स्पर्धक आणि पंजाबी पार्श्वगायिका अफसाना खानची सिद्धूच्या हत्येप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे.

अफसाना खान ही सिद्धूला भाऊ मानायची. नॅशनल इन्वेस्टिगेशन एजन्सीने अफसानाला गँगस्टर कनेक्शन समजून घेण्यासाठी अनेक प्रश्न विचारले. एनआयएला असाही संशय आहे की सिद्धूच्या हत्याप्रकरणात अफसानाचाही हात असू शकतो.

दरम्यान, सिद्धूच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगचा सहकारी गोल्डी ब्रारने घेतली होती. अफसानाच्या खानच्या चौकशीनंतर सिद्धूच्या मृत्यूबाबत आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles