Tuesday, July 23, 2024

“अपल्याला डॅशिंग लोक पाहिजे, जे बोलून आग लावू शकतात…”

maharashtra“अपल्याला डॅशिंग लोक पाहिजे, जे बोलून आग लावू शकतात…”

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी गायिका अमृता फडणवीस यांनी कलर्स मराठीवर बिग बाॅस सीझन 4 या शोमध्ये कालच्या भागात हजेरी लावली.

दिवाळी सणाच्या निमिताने त्यांना या शोमध्ये अमंत्रीत केलं होतं. यावेळेस घरच्या सदस्यांनी त्यांच्यासोबत खूप धमाल केली. त्यांना राजकारणाबद्दल प्रश्न विचारले. सदस्यांच्या प्रश्नावर त्यांनीही मजेशीर उत्तरं दिली.

कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक नवा प्रमो प्रक्षकांसाठी शेअर केला. ज्यामध्ये बिग बाॅसच्या घरातील सदस्य आणि अभिनेता किरण माने अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारतो की, महाराष्ट्राचं एक राजकीय वर्तुळ आहे ते म्हणजे एक बिग बॉस आहे. तर यामधील तुम्हाला 5 सदस्य कोण वाटतात?

अमृता फडणवीस उत्तर देत म्हणाल्या, अपल्याला डॅशिंग लोक पाहिजे जे कधीही काही बोलू शकतात आणि आग लावू शकतात. त्यानंतर किरण माने यांनी त्यांना अणखी एक प्रश्न विचारला की, बिग बाॅसमधील सदस्यांसारखे तुमच्यातही कधी वाद होत असतील ना? यावर त्या म्हणाल्या आपला नवरा हाती तर लागला पाहिजे ना काम द्यायला’.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles