बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी एक मोठी घोषणा केली आहे. देशातील पुरुष आणि महिला क्रिकेट संघांतील खेळाडूंना समान मानधन देण्याचा निर्णय बीसीसीआयकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटच्या दृष्टिकोनातून ही एक आनंदाची बातमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुरुष आणि महिला क्रिकेट संघांतील खेळाडूंना मिळणा-या मानधनांमध्ये आतापर्यंत तफावत होती. पण आता ही तफावत संपवून दोन्ही संघांतील खेळाडूंना समान मानधन देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. बीसीसीआयच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सचिवपदी निवडून आल्यानंतर जय शहा यांनी ही मोठी घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात याआधी अशी क्रांतिकारी घोषणा कधीही करण्यात आली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
या नव्या बदलांनुसार एकदिवसीय सामन्यांसाठी पुरुष आणि महिला क्रिकेट संघांतील खेळाडूंना लाख रुपये मानधन देण्यात येईल. तसेच टी-20 सामन्यांसाठी 3 लाख रुपये मानधन देण्याची घोषणा करण्यात आली आहे. महिला क्रिकेट संघाला स्पॉन्सर्स अजूनही मोठ्या प्रमाणावर मिळत नाहीत पण तरीही आता बीसीसीआयने दोन्ही संघांतील खेळाडूंना समान मानधन देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.