जगातील सर्वात स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांच्या यादीत आणखी दोन भारतीय समुद्रकिनारे समाविष्ट झाले आहेत अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी बुधवारी दिली. लक्षद्वीपमधील मिनीकॉय, थुंडी समुद्रकिनारा आणि कदमत समुद्रकिनारा या दोन समुद्रकिनाऱ्यांनी ब्ल्यू बीचेसच्या यादीत स्थान मिळवले आहे.
या दोन समुद्रकिनाऱ्यांचा समावेश ब्ल्यू बीचेसच्या यादीत झाल्यामुळे आता भारतातील ब्ल्यू बीचेसची संख्या १२ झाली आहे. थुंडी हा लक्षद्वीपमधील नयनरम्य समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. तर कदमत समुद्रकिनारा हा जलक्रीडा करण्यासाठी क्रूझ पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.
या यादीतील इतर समुद्रकिनाऱ्यांमध्ये गोल्डन बीच (ओडिशा), शिवराजपूर (गुजरात), कप्पड (केरळ), घोघला (दिव), राधानगर (अंदमान आणि निकोबार), कासारकोड (कर्नाटक), पदुब्रिद्री (कर्नाटक), ऋषीकोंडा (आंध्र प्रदेश), कोवलम (तामिळनाडू), एडन (पुदुच्चेरी) या किनाऱ्यांचा समावेश आहे.
पुरीतील गोल्डन बीच हा आशियातील पहिला ब्ल्यू फ्लॅग मिळालेला किनारा आहे. गतवर्षी त्यात कोवलम आणि एडन या किनाऱ्यांचा समावेश झाला होता. जगातील सर्वात समुद्र किनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग लेबल दिले जाते.