Friday, May 24, 2024

“जय महाराष्ट्र! मी एकनाथ शिंदे बोलतोय…”; सदस्य नोंदणीसाठी भन्नाट फंडे

देश“जय महाराष्ट्र! मी एकनाथ शिंदे बोलतोय...”; सदस्य नोंदणीसाठी भन्नाट फंडे

आपला पक्ष वाढावा यासाठी प्रत्येक पक्षाकडून रणनीती आखली जाते. तसाच काहीस प्रयत्न आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून केला जात आहे. शिंदे गटाने आपल्या पक्षाला बळकट करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. शिंदे गटाने IVR अर्थात स्वयंचलित काॅलिंग यंत्रणेच्या माध्यमातून सदस्य नोंदणीला सुरुवात केली आहे.

शिंदे गटाची आता थेट मोबाईलद्वारे सदस्य नोंदणीला सुरुवात झाली आहे. सदस्य नोंदणीसाठी स्वयंचलित काॅलिंग यंत्रणेद्वारे हा मेसेज पाठवला जात आहे. नंबर डायल करताच शिंदेंचा आवाज येत आहे आणि नोंदणीसाठी आवाहन केले जात आहे.

या स्वयंचलित काॅलिंग यंत्रणेत एकनाथ शिंदे नेमके काय म्हणतात, हे जाणून घेण्याबाबत अनेकांना उत्सुकता असेल. या फोन काॅलद्वारे एकनाथ शिंदे सर्वांना सदस्य नोंदणीसाठी आवाहन करत आहेत. “जय महाराष्ट्र! मी एकनाथ शिंदे बोलत आहे. हिंदूह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्यासाठी मी एक भक्कम पाऊल उचलले आहे. सुजलाम, सुखलाम महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी आपणही माझ्यासोबत सामील व्हा. सामील होण्यासाठी क्रमांक 1 दाबा”, असे एकनाथ शिंदे बोलत असल्याचे काॅलमध्ये ऐकून येते.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles