टी 20 वर्ल्ड कप 2022 ची सुरूवात भारत-पाकिस्तान सामन्यापासून झाली. या सलामीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. यानंतर गुरूवारी भारताचा दुसरा सामना नेदरलॅंडसोबत पार पडला.
गुरूवारच्या दुसऱ्या सामन्यातही भारत विजयी ठरला. त्यामुळं भारत सलग दुसऱ्यांदा जिंकत ग्रुप 2 मध्ये 4 गुणांसह अव्वलस्थानी पोहोचला आहे. तसेच विराट कोहलीनेही सलग दुसऱ्यांदा अर्धशतक केलं. त्यामुळे क्रिकेटप्रेमींकडून त्यांचं कौतुक होत आहे.
कॅप्टन रोहित शर्माने 53 धावांचं योगदान दिलं. तर सुर्यकुमार यादवने 51 धावांचं आणि विराट कोहलीनं 62 धावांचं योगदान दिलं. एकूणच भारताने प्रथम बॅटींग करत 20 ओव्हरमध्ये 179 धावा केल्या.
नेदरलॅंडने जिंकण्यासाठी 180 धावांचा पाठलाग करण्यास अयशस्वी ठरले. नेदरलॅंड 20 ओव्हरमध्ये फक्त 123 धावा करू शकले. त्यामुळे गुरूवारचा सामनाही भारताच्या नावावर झाला.