Tuesday, July 23, 2024

जम्मू काश्मिरमध्ये लष्कराच्या वाहनाजवळ स्फोट; एक दहशतवादी ठार

देशजम्मू काश्मिरमध्ये लष्कराच्या वाहनाजवळ स्फोट; एक दहशतवादी ठार

मागच्या अनेक दिवसांपासून दहशतवादांच्या कारवाया वाढल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा बांदीपोरामध्ये भारतीय लष्कराच्या वाहनाजवळ मोठा स्फोट घडवून आणल्याची घटना घडली आहे. या स्फोटात कोणतीही हानी झाली नसून लष्कराने शोधमोहिम सुरु केली आहे. दुसरीकडे, कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि लष्कराच्या जवानांची दहशतवाद्यांशी चकमक सुरु असून, यामध्ये आतापर्यंत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले आहे.

काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात गुरुवारी संध्याकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती. पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी तैनात करण्यात आले असून, या चकमकीत आतापर्यंत एक दहशतवादी ठार झाला आहे. तर त्याचवेळी लष्कराच्या वाहनावर झालेल्या स्फोटामुळे आता दहशतवाद्यांविरोधात कठोर शोध मोहिम राबवण्यात येत आहे. तर दुसरीकडे, कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडताना लष्कराने लष्कर-ए-तैयबाच्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याला ठार केले आहे.

या ठार झालेल्या दहशतवाद्याकडून एक एके 47 रायफल, एक पिस्तूल, दोन चिनी बनावटीचे ग्रेनेड आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे. दहशतवाद पसरवण्याच्या उद्देशाने सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती लष्काराला मिळाली होती.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles