Friday, May 24, 2024

“नरेंद्र मोदी देवाचा अवतार…”; उत्तर प्रदेशच्या राज्यमंत्र्याचे दिव्य ज्ञान!

maharashtra“नरेंद्र मोदी देवाचा अवतार…”; उत्तर प्रदेशच्या राज्यमंत्र्याचे दिव्य ज्ञान!

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाचा अवतार आहेत. असून ते हवं तेव्हा लोकांकडून त्यांना जे हवं ते ते करवून घेतात. ते देवाचाच अवतार आहेत, असं वक्तव्य उत्तर प्रदेशच्या राज्यमंत्री गुलाब देवी यांनी केलं आहे.

गुलाब देवी एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर मोदी हवं तोपर्यंत पंतप्रधान पदावर राहू शकतात असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता गुलाब देवी यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

गुलाब देवी या सांभल जिल्ह्यातील चांदौसी या मतदारसंघातील भाजपच्या आमदार आहेत. त्यांनी एका ठिकाणी बोलताना मोदींचं तोंडभरून कौतुक करत त्यांना देवाचा अवतार बनवलं असून त्यांचे हे वक्तव्य सध्या खूप चर्चेचा विषय बनलं आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदींची बरोबरी कोणीही करू शकणार नाही. शिवाय जोपर्यंत मोदींची इच्छा आहे जोपर्यंत त्यांचे आयुष्य आहे तोपर्यंत ते पंतप्रधान राहतील, असं देखील त्या यावेळी म्हणाल्या.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles