देशरक्षणासाठी त्याग व बलिदान देणाऱ्या पायदळातील सर्व जवानांना 76 व्या ‘पायदळ दिवसा’निमित्त लष्कराच्या दक्षिण विभागाने पुणे इथे राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली. परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, सेना पदक या पदकांनी सन्मानित, लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जय सिंह नयन यांनी स्मारकावर पुष्पचक्र वाहिले. यावेळी पायदळाचे विद्यमान आणि निवृत्त जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते. परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक या पदकांनी सन्मानित निवृत्त लेफ्टनंट जनरल आर. व्ही. कुलकर्णी यांनी निवृत्त जवानांच्या वतीने पुष्पचक्र वाहिले