Tuesday, October 1, 2024

पाकिस्तान झिम्बाब्वेसोबतही हरला, T20 World Cup मधून बाहेर पडण्याच्या मार्गावर

खेलपाकिस्तान झिम्बाब्वेसोबतही हरला, T20 World Cup मधून बाहेर पडण्याच्या मार्गावर

T20 World Cup 2022 च्या मालिकेत पाकिस्तान झिम्बाब्वेसोबत हरल्याने पाकिस्तानचे वर्ल्ड कपमधील स्थान डळमळले आहे. पाकिस्तान एकदा भारतासोबत आणि आता झिम्बाब्वेसोबत हरला आहे. सलग २ सामने हरल्याने पाकिस्तान बी ग्रुपमध्ये तळाला पोहचला आहे. आता पाकिस्तान वर्ल्ड कपच्या स्पर्धेतून बाहेर पडणार हे निश्चित झाले आहे.

T20 World Cup 2022 मध्ये, पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे संघ पर्थच्या मैदानावर आमनेसामने आले. हा सामना खूपच रोमांचक झाला आणि झिम्बाब्वेने 1 धावाने विजय मिळवला. या सामन्यात झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी गमावून 130 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा डाव 20 षटकांत 8 गडी गमावून 129 धावाच करू शकला. या सामन्यात पाकिस्तानची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली. पाकिस्तानचे दोन्ही सलामीवीर बाबर आझम 9 चेंडूत केवळ 4 धावा करू शकले, तर मोहम्मद रिझवानने 16 चेंडूत 14 धावा केल्या. पाकिस्तानकडून शान मसूदने 44 धावा केल्या. याशिवाय एकाही फलंदाजाला 30 धावांचा टप्पाही स्पर्श करता आला नाही. झिम्बाब्वेकडून सिकंदर रझाने ३ बळी घेतले. दरम्यान पाकिस्तानने दोन सामने हरल्याने पाकिस्तानचे शून्य पॉईंटस आहेत, यामुळे पाकिस्तान तळाला पोहचला आहे, तर झिम्बाब्वेकडे १ पॉईंट होता आता २ पॉईंटची भर पडल्याने झिम्बाब्वेकडे ३ पॉईंट्स झाले आहेत, याचा अर्थ झिम्बाब्वे आणि साऊथ आफ्रिका एक सामान आले आहेत.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles