Saturday, April 20, 2024

पाकिस्तानला गंभीर परिणाम भोगावे लागतील’, राजनाथ सिंह यांचा इशारा

दुनियापाकिस्तानला गंभीर परिणाम भोगावे लागतील’, राजनाथ सिंह यांचा इशारा

पाकव्याप्त काश्मीरमधील भारतीयांवर पाकिस्तानकडून अनेक अत्याचार करण्यात येत आहे. याचबाबत आता भारताचे संरक्षण मंत्री मोठे विधान केले असून पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेवर जे अन्याय आणि अत्याचार पाकिस्तानकडून करण्यात येत आहेत त्याचे परिणाम पाकिस्तानला नक्कीच भोगावे लागतील असे विधान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे.

शौर्य दिवस कार्याक्रमाला गुरुवारी राजनाथ सिंह यांनी संबोधित केले. त्यावेळी त्यांनी हे विधान करतानाच पाकव्याप्त काश्मीर पुन्हा मिळवण्यासंदर्भात सूचक विधान देखील त्यांनी केले आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या सर्वांगीण विकासाचे लक्ष्य पीओकेमधील गिलगिट आणि बाल्टिस्टानपर्यंत पोहोचल्यानंतरच साध्य केले जाईल, असेही राजनाथ सिंह यांनी यावेळी म्हटले आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles