Saturday, November 9, 2024

अभिनेत्री उर्फि जावेदला पोलिसांचा दणका!

maharashtraअभिनेत्री उर्फि जावेदला पोलिसांचा दणका!

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री या त्यांच्या फॅशन सेन्स मुळे चर्चेत असतात. अनेक जणींचा फॅशन सेन्स हा नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतो तर काही अभिनेत्रींना मात्र त्यांच्या याच फॅशन सेन्समुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

विशेषत: बॉलिवूडमधील उर्फि जावेद या अभिनेत्रीसोबत हे जरा जास्तच पहायला मिळतं. उर्फि ही सुद्धा तिच्या बोल्ड आणि हॉट कपड्यांमुळे सतत चर्चेत असते. तसं पाहिलं तर उर्फि सतत विचित्र कपडे घालून लोकांसमोर येते. पण आता मात्र उर्फिला तिच्या याच हॉट फॅशन सेन्सने कायदेशीररित्या अडचणीत आणलं आहे.

उर्फिचा अलीकडेच एक गाणं रिलीज झालं आहे. ‘हाय ही ये मजबूरी’ या गाण्यात तिने विचित्र कपडे घालून समाजात अश्लीलता पसरवल्यासंबंधी एका व्यक्तीने दिल्लीतील पोलिस ठाण्यात तिच्याविरुद्ध तक्रार दाखल केलीये. या गाण्यामध्ये तिने अत्यंत बोल्ड आणि अश्लील कपडे परिधान केल्याचा आरोप एका व्यक्तीने केला आहे.

उर्फि कायम आपल्या ट्रोलर्सला उत्तर देताना दिसते. मात्र या प्रकरणावर तिने अद्याप काही भाष्य केलेलं नाही. आता याप्रकरणावर ती काय बोलणार याकडे नेटकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles