जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून एलाॅन मस्कला ओळखले जाते. आता एलाॅन मस्क ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नवे मालक बनले आहेत. एलाॅन मस्क यांनी 44 अब्ज डॉलरमध्ये ट्विटरची मालकी मिळवली. बॉलिवूड क्वीन कंगना रनौत ही तिच्या बोल्ड विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते. एलाॅन मस्क हा ट्विटरचा नवीन मालक झाल्यामुळे कंगना रनौतचे निलंबित ट्विटर खाते पुन्हा सक्रिय होईल अशी आशा ती व्यक्त करत आहे. कंगना रनौत ने इंन्सनग्रामला पोस्ट शेअर करत सांगितले की, तिला तिच्या ट्विटर वरील मित्रांची खूप आठवण येत आहे. तिचे अनेक चाहते तिनं ट्विटरवर परत यावं याकरिता मिम्स शेअर करत आहेत.
बंगाल विधानसभा निवडणूकीच्या निकाला दरम्यान कंगना रनौतने अनेक आक्षेपार्ह पोस्ट ट्विटरहून केले होते. त्यामुळेच ट्विटरने मागील वर्षी कंगना रनौतला कायमचे निलंबित केले. असे सांगण्यात आले होते की, ट्विटरच्या नियमांचे पालन न केल्यामुळे हेटफुल कंडक्ट पॉलिसी आणि एब्यूजिव पॉलिसी या अंतर्गत कंगना चे अंकाऊट निलंबित करण्यात आले होते.
त्याचवेळी, एलाॅन मस्कने ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर लगेचच त्यांनी पराग अग्रवालसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना ट्विटरहून काढून टाकले आहे. कंगनाने ती विजयी झाल्याची घोषणा तिच्या इंन्सटग्रामवर केली. तिनं इंन्सटग्रामला एक स्टोरी शेअर करत सांगितले की, तिनं या गोष्टीची भविष्यवाणी खूप आधी केली होती.