Thursday, September 12, 2024

कंगनाचे खाते पुनर्संचयित करा; चाहत्यांनी व्यक्त केली अपेक्षा

दुनियाकंगनाचे खाते पुनर्संचयित करा; चाहत्यांनी व्यक्त केली अपेक्षा

टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी ट्विटरची कमानही हातात घेतल्यानंतर, सोशल मीडियावर सर्वजण त्यांचे अभिनंदन करत आहेत. अशा परिस्थितीत बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत हिने देखील इन्स्टा स्टोरीवर त्यांनी एलोन मस्कचे अभिनंदन केले आहे. त्यानंतर तिच्या चाहत्यांनी एलोन मस्क कडे खास मागणी केली आहे.

कंगना रणौतने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एका बातमीचे हेडलाइन शेअर करताना काही इमोजी शेअर केले आहेत. इलॉन मस्क हे आता ट्विटरचे नवे मालक आहेत आणि त्यानीं कंपनीची धुरा हाती घेताच पराग अग्रवालसह अनेक उच्च पदांवर असलेल्या लोकांना निरोप दिला आहे. कंगना रणौतच्या या पोस्टवर तिचे चाहते सतत कमेंट करत आहेत, काही अभिनेत्रीने देखील तिच्या या पोस्टला शेअर केले आहे.

तिच्या काही चाहत्यानी स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले आहे, “अभिव्यक्ती स्वातंत्र्य लक्षात घेऊन, आशा आहे की तुमचे ट्विटर अकाउंट लवकरच @kanganaranaut पुनर्संचयित केले जाईल.” यासोबतच त्यांनी ‘प्रोटेक्ट फ्री स्पीच’ स्टिकरही जोडले. दुसर्‍या एका वापरकर्त्याने स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले आहे, “कृपया कंगना रणौतचे खाते पुनर्संचयित करा, ते ट्विटर कर्मचार्‍यांनी निलंबित केले आहे. धन्यवाद.”

गेल्या वर्षी मे महिन्यात कंगनाचे ट्विटर अकाउंट ‘वारंवार उल्लंघन केल्यामुळे कायमचे सस्पेंड’ करण्यात आले होते. ट्विटरच्या प्रवक्त्याने सांगितले होते, ” ट्विटर नियमांचे वारंवार उल्लंघन केल्यामुळे आम्ही संदर्भित खाते कायमचे निलंबित केले गेले आहे. आम्ही ट्विटरचे नियम हे न्यायपूर्वक लागू करतो, आणि आमच्या सेवेतील प्रत्येकासाठी ते प्रामाणिकपणे राबवले जातात.”

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles