Tuesday, July 23, 2024

10000 रुपये गुंतवून सरकारचे व्यावसायिक भागीदार व्हा : नितीन गडकरी

देश10000 रुपये गुंतवून सरकारचे व्यावसायिक भागीदार व्हा : नितीन गडकरी

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत मुंबई शेअर बाजारात आज सकाळी 9.15 वाजता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर सूचीबद्ध झाले. गडकरी यांनी घंटा वाजवून या प्रक्रियेवर शिक्कामोर्तब केले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या सचिव आणि प्राधिकरणाच्या अध्यक्ष अलका उपाध्याय यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. सर्व संस्थात्मक आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आणि प्राधिकरणाच्या विश्वासार्हतेवर विश्वास दाखवल्याबद्दल गडकरी यांनी त्यांचे आभार मानले.

मुंबई शेअर बाजारात नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर सूचीबद्ध होणे ही ऐतिहासिक घटना आहे, कारण यामुळे पायाभूत सुविधा संबंधी निधी पुरवठ्यामध्ये लोकसहभागाचा प्रवेश अधोरेखित होतो, असे नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 25% एनसीडी राखीव ठेवल्या आहेत असे सांगत, InvIT च्या दुसऱ्या फेरीला सुरुवात झाल्यापासून अवघ्या 7 तासांत जवळपास सातपट अतिरिक्त मागणी नोंदवण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली. ही गुंतवणूक सर्वाधिक विश्वासार्ह असून वार्षिक 8.05 % इतके उत्पन्न देते, असे ते म्हणाले. या माध्यमातून किरकोळ गुंतवणूकदारांना (सेवानिवृत्त नागरिक, पगारदार व्यक्ती, छोटे आणि मध्यम व्यावसायिक) राष्ट्र उभारणीच्या उपक्रमात सहभागी होण्याची संधी आपण देऊ शकलो, याचा आपल्याला मनापासून आनंद वाटत असल्याचे गडकरी यांनी सांगितले. 10,000 रुपये इतक्या किमान गुंतवणुकीपासून सुरूवात करणे शक्य असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles