नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यांच्या गृहमंत्र्यांना चिंतन शिबिराला व्हिडीओ काॅन्फरन्सिंगद्वारे संबोधित केलं. यावेळी मोदींनी पोलिसांच्या गणवेशाबाबत एक महत्वाची सूचना केली आहे.
सध्या प्रत्येक राज्यात पोलिसांचा गणवेश वेगळा आहे. प्रत्येक राज्याने आपल्या पसंतीनुसार गणवेश डिझाईन केला आहे. परंतु मोदींनी या शिबिरात बोलताना, एक देश, एक पोलीस, एक गणवेश या संकल्पनेवर चर्चा सुरू व्हावी, असं अवाहन केलं आहे.
तसेच मोदींनी एक देश, एक गणवेश या संकल्पनेचे फायदे देखील सांगितले आहेत. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कापड तयार झाल्यानं ते कापड दर्जेदार असेल. कॅप, बेल्ट यांनाही एकाच वेळी मोठी मागणी असेल.
दरम्यान, देशात कोणत्याही भागात नागरिक गेले तरी त्यांना कळेन की हे पोलिसवाला आहे. म्हणून एक पोलीस, एक गणवेश ही संकल्पना महत्वाचं असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. दरम्यान प्रत्येक राज्याच्या गणवेशावर त्या-त्या राज्याचा टॅग किंवा नंबर असू शकतो, असंही मोदींनी सांगितलं आहे.