Thursday, September 19, 2024

पोन्नियन सेल्वन ‘या’ दिवशी होणार ओटीटीवर रिलीज

देशपोन्नियन सेल्वन 'या' दिवशी होणार ओटीटीवर रिलीज

दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या पोन्नियन सेल्वन 1 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. या चित्रपटाने प्रत्येक भाषेत चांगला गल्ला कमवला आहे. त्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्याच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे ज्या प्रेक्षकांना हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पाहता आला नाही ते आता OTT वर घरबसल्या हा चित्रपट पाहू शकणार आहेत. दरम्यान OTT प्लॅटफॉर्मवर किती रूपयात हा सिनेमा पाहता येणार आहे, हे जाणून घेऊयात.

चोल साम्राज्याचा गौरवशाली इतिहास पोन्नियन सेल्वनमध्ये दाखवण्यात आला आहे. त्यामुळे गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार पोन्नियन सेल्वन 1 आता अॅमेझॉन प्राइमवर उपलब्ध होणार आहे. हा चित्रपट सध्या तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नडमध्ये प्रसारित केला जाणार आहे. तर अद्याप OTT वर हिंदीत प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळे हिंदीत सिनेमा पाहणाऱ्यांची निराशा होणार आहे.

पोन्नियन सेल्वन Amazon Prime Rental वर रिलीज होणार आहे. तर ओटीटी प्लॅटफॉर्मने सूचित केले आहे की, पोन्नियन सेल्वन सर्व Amazon प्राइम सदस्यांसाठी 4 नोव्हेंबर रोजी उपलब्ध होणार आहे. दरम्यान ओटीटीवर हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना 199 रुपये मोजावे लागणार आहेत.

पोन्नियन सेल्वन 1 ने जगभरात 480 कोटी रुपयांची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट 500 कोटींचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा आहे. पोन्नियन सेल्वन 1 ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 250 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

पोन्नियन सेल्वन 1 चित्रपटगृहात 30 संप्टेबर रोजी रिलीज झाला होता. चित्रपटगृहात रिलीज झाल्याच्या एक महिन्यानंतर ही फिल्म ओटीटीवर रिलीज होणार आहे. चित्रपटगृहात बक्कळ कमाई केल्यानंतर आता मेकर्स ओटीटीवर भरघोस कमाई करण्याचा विचार करत आहेत. दरम्यान पीएस-१ मध्ये विक्रम, कार्ती, ऐश्वर्या राय बच्चन, ऐश्वर्या लक्ष्मी, जयम रवी, त्रिषा, प्रकाश राज, पार्थिवन आणि इतर कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles