कथित ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी 30 ऑक्टोबर 2022 रोजी गुजरातमधील वडोदरा येथे भारतीय हवाई दलासाठी वाहतूकीसाठी वापरल्या जाणाऱ्या विमानाच्या निर्मिती प्रकल्पाचे उद्धाटन करतील. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम शिंदे आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
सुमारे २२ हजार कोटींहून अधिक गुंतवणूक असलेला हा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता, हे विशेष.