Friday, May 24, 2024

गुजरातमध्ये 43 वर्षांपूर्वीच्या मृत्यूतांडवाची पुनरावृत्ती

देशगुजरातमध्ये 43 वर्षांपूर्वीच्या मृत्यूतांडवाची पुनरावृत्ती

गुजरातमधील मोरबी शहरातील मच्छू नदीवरील झुलता पूल रविवारी कोसळला. त्यावर सुमारे 500 लोक होते, जे अपघातानंतर नदीत पडले. या अपघातात 140 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 70 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. या भीषण अपघाताने मोरबीतील जनतेला पुन्हा एका जुन्या वेदनादायक घटनेची आठवण करून दिली आहे. या पूर्वी घडलेल्या एका दुर्घटनेत मच्छू नदीचा बांध फुटल्याने 11 ऑगस्ट 1979 रोजी या संपूर्ण शहराचे स्मशानभूमीत रूपांतर झाले होते.

ऑगस्ट 1979 मध्ये संततधार पाऊस आणि स्थानिक नद्यांना पूर आल्याने मच्छू धरण ओव्हरफ्लो झाले होते. पाण्याच्या दाबामुळे 11 ऑगस्ट 1979 रोजी दुपारी 3.15 वाजता नदीवरील धरण फुटले आणि अवघ्या 15 मिनिटांत धरणाच्या पाण्याने संपूर्ण शहर व्यापले. घरे आणि इमारती कोसळल्या, त्यामुळे लोकांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. सरकारी आकडेवारीनुसार या अपघातात 1439 लोक आणि 12,849 हजारांहून अधिक जनावरे मरण पावली होती.

पुराचे पाणी ओसरल्याने लोकांनी शहराचे भयानक दृश्य पाहिले. खांबांवर माणसे, जनावरांचे मृतदेह लटकले होते. या दुर्घटनेत संपूर्ण शहर क्षणात ढिगार्‍यात बदलले होते आणि आजूबाजूला केवळ मृतदेहच दिसत होते. या भीषण अपघातानंतर काही दिवसांनी इंदिरा गांधी जेव्हा मोरबीला गेल्या तेव्हा इतका दुर्गंध येत होता की त्यांना या पासून वाचण्यासाठी रुमालाचा वापर करावा लागला. घटनेची भीषणता इतकी होती कि माणसांचे आणि प्राण्यांचे मृतदेह कुजलेलेलया मृतदेहातुन येणाऱ्या दुर्गंधीमुळे त्यावेळी मोरबीला भेट देणारे नेते, मदत आणि बचाव कार्यात सहभागी असलेले स्वयंसेवक देखील आजाराला बळी पडले होते.

गुजरातमधील मोरबी येथे काल रविवारी संध्याकाळी 6.30 वाजता केबल झुलता पूल कोसळल्याने या घटनेची आठवण होत आहे. कालच्या घटनेतील अपघाताशी संबंधित काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात पूल कोसळल्यानंतरचा एक व्हिडिओ दिसत आहे, ज्यामध्ये लोक तुटलेल्या पुलावर लटकून मदतीची याचना करत आहेत. अपघातानंतर कोणी पोहून वाचले, तर कोणाला तेथे उपस्थित लोकांनी वाचवले. त्याचवेळी काही व्हिडिओत लोक मृतदेह घेऊन धावत असल्याचे दिसत आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles