गुजरातच्या राजकोटमधील मोरबी भागात पूल कोसळण्याची भीषण दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेत 60 हून अधिक लोक ठार झाल्याचं वृत्त आहे. ज्यावेळी ही दुर्घटना घडली, तेव्हा त्या पुलावरती सुमारे 400 ते 450 लोक होते. मात्र किती लोक नदीत पडले, याची अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेसंदर्भात गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती घेतली. बचाव कार्यासाठी तात्काळ पथके तयार करण्याच्या सूचना पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिल्या.
तसंच पंतप्रधान मोदी यांनी परिस्थितीवर बारकाईनं सतत लक्ष ठेवण्यासह या दुर्घटनेत अडकलेल्या नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचनाही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिल्या. दरम्यान, हा पूल 7 महिन्यापासून बंद होता. नुतनीकरणानंतर केवळ 5 दिवसांपूर्वीच तो कार्यान्वित करण्यात झाल्याचे सांगण्यात आले.
या दुर्घतनेत मरण पावलेल्या मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हा पूल कशामुळे कोसळला, याला नक्की कोण जबाबदार आहे याचा तपास आता गुजरात एस आय टी करणार आहे.