राजकारणात कधी कोण आमनेसामने येईल याचा नेम नसतो. राजकीय समीकरणं क्षणाक्षणाला बदलताना पहायला मिळतात. मोठमोठे नेते मंडळींमध्येही आरोप प्रत्यारोप होत असतात.
तसंच काहीसं आत्तासुद्धा राज्यात पहायला मिळतंय. आमदार रवी राणा आणि शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. दोघांमध्ये चांगलेच आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. आता या वादामध्ये राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एन्ट्री केलीये.
एका व्यक्तीवर आरोप म्हणजे 40 आमदारांवर आरोप केल्यासारखं आहे. रवी राणा यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी राणांना आवर घालावा, असं म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती देखील केलीये. तसेच दोघांनी शांत रहावं हीच प्रार्थना, असंही पाटील यांनी म्हटलंय.
बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे. तर रवी राणांनी हे आरोप सिद्ध करून दाखवावे असं आव्हान बच्चू कडूंनी राणांना दिलंय.