Thursday, September 19, 2024

नार्वेकरांच्या जीवाला धोका, सुरक्षेत वाढ

महाराष्ट्रनार्वेकरांच्या जीवाला धोका, सुरक्षेत वाढ

उद्धव ठाकरेंच्या जवळचे मानल्या जाणाऱ्या व्यक्तींपैकी एक म्हणजे मिलिंद नार्वेकर. नार्वेकर हे ठाकरेंचे स्वीय सचिवही होते. परंतु हेच नार्वेकर शिंदे गटात सामील होणार अशा चर्चा मध्यंतरी रंगल्या होत्या.

आता पुन्हा एकदा नार्वेकर चर्चेत आले आहेत. त्यांच्या सुरक्षेत सरकारनं वाढ केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची सुरक्षा एक्स सिक्युरिटीपासून वाय सिक्युरिटी प्लस एस्काॅर्ट करण्यात आली आहे.

सध्याचं राजकीय वातावरण पाहता नार्वेकरांच्या जीवाला धोका असल्याचं राजकीय नेत्यांच्या सुरक्षतेचा आढावा घेणाऱ्या समितीनं म्हटलं आहे. याबद्दल अहवालही या समितीनं पोलिसांना दिला आहे.

दरम्यान, सर्व राजकीय परिस्थीती पाहता ठाकेर गटातील शिवसैनिक नाराज असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. म्हणजेच नार्वेकरांना त्यांच्याच गटातील कार्यकर्त्यांकडून धोका असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles