राज्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या सत्तांतरामुळे राजकीय वातावरण चांगलंच चिघळलंय. त्यातच आणखी नवनवीन मुद्द्यांवरून विरोधक आणि सत्ताधारी वारंवार आमनेसामनेही येत आहेत.
राज्यात अनेक नेतेमंडळींकडून टीकेची झोड उठवली जातेय. मात्र आता तत्कालीन मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट भाजपवरच निशाणा साधलाय. शुक्रवारी कराड येथे पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
2014 मध्ये महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळी राष्ट्रवादीने अचानक पाठिंबा काढून घेतल्यामुळे त्यावेळचं सरकार पडलं. यामुळे महाराष्ट्रात भाजप पक्ष वाढायला सुरूवात झाली भाजप पक्ष सत्तेत आला, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हे राष्ट्रवादीमुळेच आलं, असंही चव्हाण यांनी बोलताना म्हटलंय.