शिंदे – फडणवीस सरकारनं आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. गृह विभागानं नुकतंच सुरक्षेतेच्या दर्जात मोठे बदल केले आहेत. त्यामुळं शिंदे गटातील अनेक आमदार-खासदारांची सुरक्षा वाढणार आहे.
यानुसार शिंदे गटातील 4१ आमदार आणि १० खासदारांच्या सुरक्षेतेच्या दर्जात वाढ होणार आहे. त्यामुळं शिंदे गटातील आमदार आणि खासदारांना आता वाय दर्जादी सुरक्षा मिळणार आहे. तसेत शिंदे, फडणवीस आणि राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची झेड प्लस दर्जाची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे.
अमृता फडणवीसांच्या सुरक्षेतेतही वाढ करण्यात आली आहे. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. अंबानी कुटुंबाला झेड प्लस तर अभिनेता सलमानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीतील काही नेत्यांच्या सुरक्षतेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामधून उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे, शरद पवार, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांना वगळण्यात आलंय.