Thursday, September 12, 2024

रात्री उशिरा ऐश्वर्याच्या घरी जाऊन सलमानने दारू पिऊन घातला होता हैदोस; मग आला नात्यात कायमचा दुरावा

देशरात्री उशिरा ऐश्वर्याच्या घरी जाऊन सलमानने दारू पिऊन घातला होता हैदोस; मग आला नात्यात कायमचा दुरावा

बॉलिवूड अभिनेत्री, बच्चन कुटुबांची सून, सौंदर्यवती मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन हिचा आज वाढदिवस.

ऐश्वर्या आपल्या 49 वा वाढदिवस साजरा करणार आहे. मिस वर्ल्ड ते बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीपर्यंत प्रवास तिचा खूप खडतर होता.

शिवाय तिचं पसर्नल लाईफ, सलमान खान असो किंवा विवेक ओबेरॉय यांच्यासोबतचं तिचं नातं…हा सगळा प्रवास तिच्यासाठी कठीण होता.

ऐश्वर्या आणि सलमान खान यांचं प्रेमप्रकरण हा आजही रंजकतेने वाचला जाणारा विषय आहे. प्रेमात आकंठ बुडालेले हे दोघे असे वेगळे झाले कि आज एकमेकांचं तोंड पाहणंसुद्धा पसंत करत नाहीत.

बॉलीवूडमध्ये अनेक प्रेमप्रकरणं झाली त्यांचं ब्रेकअप सुद्धा झालं पण आज ते एकमेकांचे फ्रेंड्स म्हणून वावरत आहेत . मग सर्वाना हा प्रश्न पडतो कि नेमकं असं काय झालं असावं कि ऐश्वर्या आणि सलमान आज असे जगताहेत.

साल 1999 ‘हम दिल दे चुके सनम’ रिलीज झाला चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलाच डोक्यावर घेतलं होत सलमान आणि ऐश्वर्याची जोडी सर्वाना आवडली होती. खऱ्या आयुष्यात सुद्धा दोघांमध्ये प्रेमाचा अंकुर फुटू लागला होता. दोघांचं प्रेम फुलू लागलं होत जवळपास तीन एक वर्ष दोघे एकमेकांना डेट करत होते पण अचानक एके रात्री असं काही घडलं कि दोघांचं आयुष्यच बदलून गेलं..

दोघेही लग्न करणार अश्या खूप बातम्या मीडियामध्ये पसरल्या होत्या आणि अचानक ऐश्वर्याच्या स्टेटमेंटने सर्वांच्या भुवया उंचावल्या. सलमान आपल्याला मारहाण करतो असं स्टेटमेंट ऐश्वर्याने मीडियासमोर दिलं आणि एकच खळबळ माजली असं म्हटलं जात ती रात्र दोघांच्या आयुष्यातील सर्वात वाईट रात्र होती.

असं म्हटलं जात कि त्या रात्री सलमान खान खूप दारू पिऊन आला होता आणि ऐश्वर्याच्या घरी जाऊन तिच्या दरवाजावर जोरजोरात लाथा मारत होता.

यावेळी त्याच्या हातातून रक्तसुद्धा वाहत होत. काही प्रत्यक्षदर्शी असही सांगतात कि, यावेळी सलमान जोजोरात ओरडत होता दरवाजा उघडला नाही तर तो जीव देईल असाही म्हणत होता..

बराच वेळ हा हाय वोल्टेज drama सुरु होता. खूप वेळानंतर दरवाजा उघडण्यात आला सलमान आत गेला आणि त्यानंतर मात्र दोघे वेगळे झाले ते कायमचे..

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles