दिल्लीतील नरेला परिसरात आगीची मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एका प्लास्टिक कारखान्याला भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि बचावकार्य सुरु केले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इमारतीच्या काचा फोडून काही लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. या अपघातात आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला असून 2-3 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, नरेला इंडस्ट्रियल परिसरातील एका प्लास्टिक कारखान्यात आग लागली. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत तीन जणांना वाचवण्यात यश आले असून काही लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मदतकार्य सुरुच आहे.