Friday, May 17, 2024

मुख्यमंत्री शिंदे यांच्या OSDना जीवे मारण्याची धमकी

maharashtraमुख्यमंत्री शिंदे यांच्या OSDना जीवे मारण्याची धमकी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी डॅा. राहुल गेठे यांना त्यांच्या घरी नक्षलवाद्यांकडून लाल शाईने लिहिलेले धमकीचे पत्र मिळालं आहे. पत्रात नक्षलवाद्यांनी डॅा. राहुल गेठे यांना जीवे मारण्याती धमकी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली पाच वर्षे डॅा. राहुल गेठे विशेष कार्य अधिकारी(OSD) म्हणून कार्यरत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी नक्षलग्रस्त भागात अनेक विकासांची कामे सुरू केली होती. या विकास कामांची अंमलबजावणी करून ती वेगात पुर्ण करण्याची जबाबदारी विशेष कार्य अंधिकारी म्हणून डॅा. राहुल गेठे यांच्यावर होती. त्यावेळी नक्षलवाद्यांनी डॅा. राहुल गेठे यांना त्यांच्या कामात अडथळा निर्माण करत विकास कामे सुरू न करण्यासाठी धमक्या दिल्या होत्या.

आता मुख्यमंत्री झाल्यावरही एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विकासकामे वेगाने करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार डॅा. राहूल गेठे यांनी अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी डॅा. राहूल गेठे यांना टारगेट करत जीवे मारण्याची धमकीचं पत्र त्यांच्या घरी पाठवलंय.

जय लाल सलाम जय किसान ‘डॅाक्टर राहुल गेठे को आखरी चेतावणी…’ एकनाथ शिंदे का ॲाफिसर डॅा. राहूल गेठे बहुत उड रहा है. हमारा नुकसान गडचिरोली मे बहुत कर रहा है. हम हमारे भाईयोंका बदला जलद ही लेने वाले है. उसकी मौत का एलान निकल चुका है. महाराष्ट्र सरकार को उसकी जबाबदारी जितना लेना हे ले लो

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles