टी-20 विश्वचषकात भारताचा पहिला पराभव दक्षिण आफ्रिकेकडून झाला. मात्र आता T20 विश्वचषक 2022 मध्ये 2 नोव्हेंबरला टीम इंडिया पुढचा सामना बांगलादेशविरुद्ध अॅडलेडमध्ये खेळणार आहे. या सामन्यापूर्वी बांगलादेश संघाचा कर्णधार शकीब अल हसनने असे वक्तव्य केले आहे ज्यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात धक्का बसला आहे.
साकिबचे अजब विधान
भारताविरुद्ध खेळल्या जाणार्या सामन्यापूर्वी शाकिब अल हसनने आपली टीम टी-20 विश्वचषक जिंकण्यासाठी आली नसल्याचं म्हटलं आहे. शाकिब अल हसन म्हणाला, ‘आम्ही इथे टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आलो नाही. टीम इंडिया इथे जिंकण्यासाठी आली आहे. बांगलादेशने भारताला पराभूत केले तर ते उलटे होईल. एकीकडे जिथे सर्व संघ ही स्पर्धा जिंकण्यासाठी खेळत आहेत, त्याच दरम्यान शाकिबच्या या वक्तव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाचे भवितव्य आता त्याच्या हातात आहे. मात्र, रोहित शर्माचा संघ याला आता हलक्यात घेऊ शकत नाही. भारताला आता सुपर 12 च्या ग्रुप-2 मधील त्यांचे दोन उर्वरित सामने बांगलादेशविरुद्ध 2 नोव्हेंबरला आणि 5 नोव्हेंबरला झिम्बाब्वेविरुद्ध खेळायचे आहेत. भारत दुसऱ्या आणि दक्षिण आफ्रिका पहिल्या स्थानावर आहे.
सुपर 12 च्या गट 2 चे मोठे चित्र असे आहे की ग्रुप 2 च्या गुणतालिकेत भारताला अव्वल स्थान मिळविण्यासाठी, दक्षिण आफ्रिकेला पुढील सामन्यांमध्ये पाकिस्तान किंवा नेदरलँड्सपैकी एकाकडून पराभूत होणे महत्वाचे आहे. आणि भारताला त्याचे दोन्ही सामने जिंकणे गरजेचे आहे.
T20 विश्वचषक 2022 च्या सुपर 12 मध्ये टीम इंडियाने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत, तर बांगलादेशने देखील 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. ग्रुप 2 मध्ये बांगलादेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. अशा स्थितीत बांगलादेशचा संघही उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित करू शकतो. मात्र, टीम इंडियाला पराभूत करणे बांगलादेशसाठी सोपे नाही.
टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 11 सामने खेळले गेले आहेत. टीम इंडियाने यापैकी 10 सामने जिंकले आहेत, तर बांगलादेशने फक्त 1 सामना जिंकला आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर या सामन्यात टीम इंडियाचे पारडे जड असणार आहे.