Saturday, April 20, 2024

भारताच्या विरोधात पाकिस्तानचा मोठा कट उघड

दुनियाभारताच्या विरोधात पाकिस्तानचा मोठा कट उघड

भारतीय गुप्तचर यंत्रणने मोठा खुलासा केला आहे. जगातील विविध देशांमध्ये राहणाऱ्या खलिस्तानी समर्थकांच्या माध्यमातून पाकिस्तान पंजाबला भारतापासून वेगळे करण्याचा कट रचत असल्याचं पुढे आले आहे. सोशल मीडियावर खलिस्तानशी संबंधित हॅशटॅग ट्रेंड करण्यासाठी खलिस्तानी गट अशा घोस्ट ट्विटर अकाउंटची मदत घेतात. इतकेच नाही तर गेल्या महिन्यात 10 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान खलिस्तान जनमताच्या समर्थनार्थ 29032 ट्विट करण्यात आले होते, ज्यांना जगभरात 7826 लोकांनी रिट्विट केले होते.

या महिन्यात खलिस्तानच्या समर्थनार्थ 334 नवीन ट्विटर अकाउंट्सही तयार करण्यात आली आहेत. सुरक्षा एजन्सीशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची आयएसआय सतत खलिस्तानी दहशतवादी आणि खलिस्तानी समर्थकांच्या संपर्कात असते.

पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने पाकिस्तानातील लाहोरमध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांच्या अनेक बैठका घेतल्या आहेत. पाकिस्तान जगभरातील आपले दूतावास आणि उच्चायुक्तांच्या माध्यमातून खलिस्तानी समर्थकांना आणि दहशतवाद्यांना मदत करत आहे. त्यांनी पैसा आणि शस्त्रे पुरवत आहेत. जेणेकरून भारतात अशांतता पसरवता येईल.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles