Wednesday, December 4, 2024

इंटरनेट वाय-फाय पासवर्ड शेअर न केल्यानं भर रस्त्यात हत्या

देशइंटरनेट वाय-फाय पासवर्ड शेअर न केल्यानं भर रस्त्यात हत्या

एका सतरा वर्षाच्या तरूणानं इंटरनेट वाय-फाय पासवर्ड शेअर न केल्यानं त्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे नवी मुंबईतील परिसर हादरला आहे. कामोठे येथील हाऊसिंग सोसायट्यांमध्ये सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या दोन तरुणांना 17 वर्षीय तरुणाने इंटरनेट वाय-फायचा पासवर्ड शेअर करण्यास नकार दिल्याने त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. कामोठे सेक्टर 14 येथील भर रस्त्यात हा प्रकार घडलाय. आरोपी रवींद्र अटवाल आणि राज वाल्मिकी हे दोघेही सफाई कामगार म्हणून काम करत असून मृत विशाल मौर्य हा बेकरी मध्ये काम करतो. विशाल मोर्यने आपला इंटरनेट पासवर्ड देण्यास नकार दिल्याच्या रागातून रवींद्र आणि राज यांनी विशालला रस्त्यात गाठत त्याच्यावर चाकूने हल्ला चढवला. या हल्ल्यात विशालचा मृत्यू झाला असून कामोठे पोलिसांनी दोघं आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. या प्रकरणी अद्याप तपास चालू आहे. सध्या अशा तऱ्हेच्या घटनांमुळे समाजात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा घटनांना वेळीच आळा बसला नाही तर तरूण मुलांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न उद्भवतो आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles