Saturday, July 27, 2024

LPG गॅस सिलेंडर 115 रुपयांनी स्वस्त

देशLPG गॅस सिलेंडर 115 रुपयांनी स्वस्त

दिवाळीनंतर प्रथमच व्यावसायिक वापराच्या LPG सिलिंडरच्या किमतीत मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. आज म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून LPG गॅस सिलेंडर 115 रुपयांनी स्वस्त झाला आहे. तथापि, देशातील व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ही कपात झाली आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

IOCL नुसार, आज पासून म्हणजे 1 नोव्हेंबरपासून दिल्लीत इंडेनच्या 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 115.5 रुपये, कोलकाता 113 रुपये, मुंबई 115.5 रुपये, चेन्नईमध्ये 116.5 रुपये कमी असेल. यापूर्वी 1 ऑक्टोबर रोजी या सिलिंडरची किंमत 25 रुपयांनी कमी करण्यात आली होती. 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीतच कोणताही बदल झाला नाही तो जुन्या किमतीत उपलब्ध असेल.

चार महानगरांमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या नवीन किमतीत झालेल्या बदलाप्रमाणे आता दिल्लीत इंडेनचा 19 किलोचा सिलिंडर 1859.5 रुपयांऐवजी 1744 रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये तो 1846 रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी तिथे 1995.50 रुपयांना उपलब्ध होता. त्याचबरोबर मुंबईत व्यावसायिक सिलिंडर 1844 रुपयांऐवजी 1696 रुपयांना मिळणार आहे. तर चेन्नईमध्ये पूर्वी 2009.50 रुपये मध्ये मिळणारा LPG सिलेंडर आता 1893 रुपयांना मिळणार आहे.

देशातील गॅस कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरची किंमत ठरवतात. व्यावसायिक एलपीजी गॅस बहुतेक हॉटेल्स, खाद्यपदार्थांची दुकाने इत्यादींमध्ये वापरला जातो. त्यामुळे त्यांना किमतीतील कपातीमुळे व्यासायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सलग सहाव्या महिन्यात व्यावसायिक गॅसच्या किमती कमी झाल्या आहेत.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles