Sunday, February 9, 2025

नीता अंबानी साडी नेसविण्यासाठी देते 1 लाख रुपये

देशनीता अंबानी साडी नेसविण्यासाठी देते 1 लाख रुपये

आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणून अंबानी कुटुंबाकडे पाहिलं जातं. उद्योगपती रिलायंस आणि जियोचे कर्ताधर्ता मुकेश अंबानी आणि त्यांचं कुटुंब महागड्या छंदांसाठी ओळखलं जातं. मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांचा आज वाढदिवस… नीता अंबानी या कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. जपानी टी सेट, लक्झरी हँडबॅगसह सँडल्स, बूट, हिऱ्यांनी जडलेली साडी, महागड्या दागिनींसाठी निता अंबानी ओळखल्या जातात. नीता अंबानी जपानचा सर्वात जुना क्रॉकरी ब्रँड नोरिटेकच्या कपात चहा पितात. नोरिटेक क्रोकरीच्या संचात 50 कप असतात. विशेष म्हणजे याला सोन्याची बॉर्डर असते. त्याची किंमत दीड कोटी रुपये आहे. म्हणजेच यातील एका कपाची किंमत 3 लाख रुपये इतकी आहे. नीता अंबानींना महागडी घड्याळं वापरण्याची खूप आवड आहे. नीता अंबानी या खूप महागड्या लिपस्टिक वापरतात. या लिपस्टिक खास त्यांच्यासाठी बनवल्या जातात. त्यांच्याकडे साधारण 40 लाखांचे लिपस्टिक कलेक्शन आहे. म्हणून म्हणतात बड़े लोगों की बड़ी बातें…पण सर्वसामान्यांना श्रीमंत लोकांविषयी जाणून घ्यायला खूप आवडतं.

नीता अंबानी यांच्या महागड्या कपडयांपासून वस्तूंपर्यंत सगळ्या गोष्टी लक्ष वेधून घेणाऱ्या ठरतात. नीता अंबानी या बऱ्याचदा पारंपारिक अंदाजात दिसतात. साडी आणि ड्रेस परिधान करणं त्या सर्वात जास्त पसंत करतात. पण त्यांच्या सुंदर पारंपारिक लूकमागे एक महिला आहे जी नीता अंबानी यांना साडी नेसवण्यासाठी लाखो रुपये घेते. कोण आहे ही महिला आणि फक्त साडी नेसविण्यासाठी लाखो रुपये असं काय आहे खास…तर चला आज आपण या महिलेबद्दल जाणून घेऊयात…

भारतीय संस्कृतीत साडीला अनन्य साधारण महत्त्व आहे. आज जग कितीही मॉडन झालं तरी तरुणी या साडीमध्येच जास्त सुंदर दिसतात. तरुणांनाही मुली साडीमध्ये जास्त आकर्षित वाटतात. नीता अंबानी यांना महिलेला साडी नेसवण्यासाठी लाखो रुपये देतात. या महिलेचं नाव डॉली जैन असं आहे. ज्यांचा जन्म कर्नाटकच्या बंगळुरुमध्ये झाला आहे. या महिलेने आतापर्यंत अनेक मोठ्या बॉलिवूड स्टार्संना साडी नेसवली आहे. मोठ्या फंक्शनसाठी अनेक सेलिब्रिटी डॉली यांना साडी नेसवण्यासाठी बोलावतात. दीपिका पादुकोणपासून ते नीता अंबानीपर्यंत सर्वांना साडी नेसवली आहे. कतरिनानेही तिच्या लग्नात डॉलीची मदत घेतली होती. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये डॉली जैन यांचं नाव आलं आहे. त्या फक्त 18 सेकंदात उत्तम साडी नेसवू शकतात.असा रेकॉर्ड त्यांनी केला आहे. डॉली या 325 पद्धतीने साडी नेसवू शकतात. वेगवेगळ्या पद्धतीने साडी नेसविण्यासाठी डॉली या 35 हजारांपासून लाखोच्या घरात पैसे घेतात. डॉली जैन या सोशल मीडियावरही खूप एॅक्टिव असतात. लाखोंच्या संख्येत त्यांचे फॉलोअर्स आहेत.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles