Tuesday, July 23, 2024

‘फोटोसेशन’साठी काय पण..? जखमींना भेटायला येणाऱ्या पंतप्रधानांसाठी रुग्णालयात सजावट..

दिल्ली‘फोटोसेशन’साठी काय पण..? जखमींना भेटायला येणाऱ्या पंतप्रधानांसाठी रुग्णालयात सजावट..

गुजरातमधील मोरबी येथे केबल-स्टेंड पूल कोसळल्याने मृतांची संख्या 132 च्या वर पोहोचली आहे. अनेकांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. या दुर्घटनेनंतर जगभरातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही या घटनेवरुन दुःख व्यक्त करत मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेत बचावलेल्या जखमींना मोरबी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जखमींची भेट घेण्यासाठी रुग्णालयात जाणार आहेत. मात्र या अपघातानंतरही राजकीय आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणाऱ्या रुग्णालयात रंगकाम सुरु असल्याचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करून विरोधकांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेसने याला शोकांतिका म्हटले आहे, तर आम आदमी पक्षाने ही भाजपच्या फोटोशूटपूर्वीची तयारी असल्याचे म्हटले आहे.

गुजरातमधील मोरबी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन होण्यापूर्वी रात्री उशिरा रंगरंगोटीचे काम करण्यात आले. ऐतिहासिक पूल कोसळून जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने सिव्हिल हॉस्पिटलच्या नूतनीकरणाचे कथित फोटो शेअर केले आहेत आणि दावा केला आहे की पंतप्रधानांचे चांगले फोटो यावेत यासाठी ही सर्व व्यवस्था केली जात आहेत.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles