Thursday, September 19, 2024

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी 29 नोव्हेंबरला

महाराष्ट्रमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी 29 नोव्हेंबरला

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुरू असलेली सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आज पुढे ढकलण्यात आली दोन्ही पक्षांना आपली बाजू मांडण्यासाठी घटनापीठाने चार आठवड्यांचा वेळ दिला न्यायाधीश चंद्रचूड यांनी, दोन्ही बाजूंच्या वकीलांनी दोन्ही गटांच्या कागदपत्रांचा गोषवारा सादर करा, असे निर्देश आज दिले आहेत आता पुढील सुनावणी 29 नोव्हेंबर रोजी होणार आहे

तसेच, पुराव्यांची यादीही सादर करण्यासाठी आणि दोन्ही गटांना आपली लेखी बाजू मांडण्यासाठी न्यायालयाने पुढील चार आठवड्यांचा वेळ दिला आहे. म्हणजेच आज न्यायालयाने कोणताही युक्तीवाद ऐकून न घेता. दोन्ही गटांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, दिवाळी आणि इतर सुट्ट्यांमुळे ऑक्टोबर महिन्यामध्ये ही सुनावणी महिनाभर पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षासंबंधी दाखल करण्यात आलेल्या वेगवेगळ्या याचिकांवर आज सुनावणी होणार होती. पण आज होणारी सुनावणी आता चार आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles