Tuesday, April 16, 2024

विराट कोहली आणि रोहित शर्मा टी-20 वर्ल्ड कप मध्ये खेळणार नाहीत

खेलविराट कोहली आणि रोहित शर्मा टी-20 वर्ल्ड कप मध्ये खेळणार नाहीत

टी20 वर्ल्डकप 2022 नंतर भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध तीन T20 आणि तीन वनडे सामने होतील. मात्र या सामन्यादरम्यान क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली हे T20 World Cup 2024 मध्ये होणाऱ्या सामन्यात दिसणार नाही. याचपार्श्वभूमीवर भारताचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

न्यूझीलंड आणि बांगलादेश दौऱ्यासाठी सोमवारी (31 ऑक्टोबर) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी व्हर्च्युअल पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकारांकडून चेतन शर्मा यांना विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या भवितव्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

त्यावर उत्तर देताना चेतन शर्मा म्हणाले की, “टूर्नामेंटच्या वेळी तुम्ही याबद्दल कसे काय बोलू शकता. मी टूर्नामेंट सुरू असताना विराट-रोहित यांच्या भविष्याबद्दल कोणाशीही काही बोलणार नाही. ते दोघेही मोठे खेळाडू आहेत. त्यांना काही वाटले तर ते स्वतः येऊन आमच्याशी बोलतील.”

चेतन शर्मा पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले, ‘युवा खेळाडूंना वरिष्ठ खेळाडूंकडून खूप काही शिकता येते. वरिष्ठ खेळाडूंच्या अनुभवातून युवा खेळाडू कसे शिकतात हे मी कालांतराने पाहिले आहे. युवा खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या खेळाडूंकडून कठीण परिस्थितीत दबाव कसा हाताळायचा हे शिकू शकतात. क्रिकेटचे दरवाजे कधीही कोणासाठी बंद नसतात.

रोहित शर्मा 35 वर्षांचा आणि विराट कोहली 33 वर्षांचा आहे. परंतु हे दोघेही टी-20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे सर्वात यशस्वी खेळाडू आहेत. विराट कोहलीने टीम इंडियासाठी आतापर्यंत 112 टी-20 सामन्यांमध्ये 52.27 च्या सरासरीने 3868 धावा केल्या आहेत. तर रोहित शर्माच्या 145 टी-20 सामन्यांमध्ये 31.22 च्या सरासरीने 3809 धावा आहेत.

भारताचा न्यूझीलंड दौरा 18 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. आधी 3 टी 20 सामन्यांची सीरीज खेळली जाईल. त्यानंतर तीन वनडे सामन्यांची सीरीज होईल. रोहित आणि कोहली मागच्या काही काळापासून सतत खेळत आहेत. रोहितने यावर्षी आतापर्यंत 26 टी 20 इंटरनॅशनल सामने आणि 6 वनडे खेळल्या आहेत. त्याशिवाय तो आयपीएलमध्येही खेळला. रोहित विनाब्रेक सातत्याने खेळतोय.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles