Friday, November 22, 2024

वाहतूक नियम आणखी कठोर; सीटबेल्ट न लावल्यास दंडात्मक कारवाई

देशवाहतूक नियम आणखी कठोर; सीटबेल्ट न लावल्यास दंडात्मक कारवाई

कारने प्रवास करण्यासारखी सुखसोय नाही असं बरेचजण म्हणतात. हल्ली कार ही एक Luxury राहिली नसून अनेकांच्या आयुष्यात ती दैनंदिन गरजांपैकी एक झाली आहे. पण, याच कारमध्ये सीटबेल्ट नसल्यास आता तुम्हाला कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागणार आहे.

कारने प्रवास करताय? सीटबेल्ट लावा…कारण, आजपासून मुंबईत चारचाकीमध्ये मागील आसनांवर असणाऱ्या प्रवाशांनाही सीटबेल्ट लावणं बंधनकारक असणार आहे. सीटबेल्ट न लावल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे.

ही दंडात्मक कारवाई 11 नोव्हेंबरपासून होणार आहे. कारण दरम्यानच्या काळात ज्यांच्या कारमध्ये सीटबेल्ट नाहीत त्यांना तो बसवून घेण्यासाठीचा वेळ देण्यात आला आहे. सध्या सीटबेल्ट असूनही तो न वापरणाऱ्यांना 10 नोव्हेंबरपर्यंत समज दिली जाणार आहे. तर, सीटबेल्ट नसलेल्यांना एक महिन्यांची मुदतवाढ मिळणार आहे.

केंद्रीय मोटार वाहन नियम 125 (1) अन्वये आठ प्रवासी क्षमता असणाऱ्या वाहनांमध्ये Front Facing प्रवाशांना सीट बेल्ट लावणं बंधनकारक आहे. पण, मोटार वाहन (सुधारित) कायदा 2019 कलम 194 (ब) (1) अंतर्गत वाहन चालकासह प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांनी सीट बेल्टचा वापर करावा. सीट बेल्ट न वापरल्यास वाहन चालकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles