Wednesday, May 22, 2024

महिला सक्षमीकरणासाठी अदानी फाऊंडेशनचा पुढाकार

देशमहिला सक्षमीकरणासाठी अदानी फाऊंडेशनचा पुढाकार

महिला सक्षमीकरणासाठी अदानी फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. ४ हजार महिलांच्या उपजीविकेच्या दृष्टीने सक्षम होण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळासोबत फाऊंडेशनने भागीदारीचा करार केला आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरणाच्या कामाला आणखी गती मिळेल, अशी अपेक्षा व्याक्त केली जात आहे.
महिला सक्षमीकरणासाठी मुंबईतील मालाड, मालवणी आणि बोरिवली परिसरात अद्वितीय प्रारूप सुरू केले आहे. उपजीविकेच्या दृष्टीने महिला सक्षम होण्याकरिता परिसरातील इच्छुक यामुळे बचत ते उद्योजकतेच्या दिशेने प्रवास सुरू करू शकतील. या प्रकल्पामुळे संभाव्य आणि महत्त्वाकांक्षी उद्योजकांचे जीवन मूल्य उंचावले जाईल. त्याबाबत अदानी फाउंडेशन आणि माविम यांच्यात औपचारिक करार झाला. त्यावर महामंडळाच्या रुपल अग्रवाल आणि अदानी फाउंडेशनचे कार्यकारी संचालक वसंत गढवी यांनी स्वाक्षरी केली आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles