Sunday, June 11, 2023

ऐश्वर्या राय बच्चनची संपत्ती आली समोर

मनोरंजनऐश्वर्या राय बच्चनची संपत्ती आली समोर

स्वत:च्या मादक सौदर्यांनी चाहत्यांना घायाळ करणारी विश्वसुंदरी अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राॅय बच्चन. आज ऐश्वर्याचा वाढदिवस आहे. त्यामुळे तिचे चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

सध्या ऐश्वर्या चित्रपटसृष्टी पासून दूर आहे. अनेक वर्षांनंतर तीने सध्या आलेल्या ‘पोन्नियिन सेल्वन भाग 1’ मध्ये व्यक्तीरेखा साकारली आहे. मात्र कोणत्याही चित्रपटात काम न करता ऐश्वर्याकडे सध्या करोडोची संपत्ती कशी आहे?, असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो.

याचं कारण म्हणजे एका चित्रपटासाठी काम करताना ऐश्वर्या 10 ते 12 कोटींचं मानधन घेते. एका जाहिरातीसाठी काम करताना ती 7-8 कोटींचं मानधन आकारते. तसेच ब्रॅड इंडोर्समेंटद्वारे ऐश्वर्या वर्षाला 80-90 कोटी कमावते.

‘अ‌ॅम्बी’ नावाच्या कंपनीत ऐश्वर्या गुतंवणूकदार आहे. बांद्रा-कुर्ला काॅम्पलेक्समध्ये तिच्या नावे 21 कोटी रुपयांचा फ्लाॅट आहे. तसेच दुबईच्या जुमेराह गोल्फ एस्टेटसमध्ये तिचा बंगला आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles