Sunday, December 10, 2023

अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेत करण्यात आली वाढ

महाराष्ट्रअमृता फडणवीस यांच्या सुरक्षेत करण्यात आली वाढ

अनेक नेते आणि सेलिब्रेटी त्यांच्या सुरक्षेची विशेष अशी काळजी घेतात. आपल्या सुरक्षतेसाठी अनेकजण बाॅडिगार्ड सुद्धा ठेवतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस आणि बाॅलिवूडचा भाईजान अभनेता सलमान खान यांची सुरक्षा वाढवली आहे

अमृता फडणवीस आणि अभिनेता सलमान खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून मिळालेल्या धमकीनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ केली असून त्याला वाय प्लस श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे.
सलमान खान सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना देखील सुरक्षा देण्यात आली आहे. म्हणजे सलमान खान आणि अमृता फडणवीस यांना आता चार शस्त्रधारी सुरक्षारक्षक 24 तास सुरक्षा पुरवणार आहेत.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles