लख्ख समुद्र किनारे, अमेझॉनचं घनदाट जंगल, फुटबॉल, सांबा आणि कार्निव्हल… ब्राझील हा देश या सगळ्या गोष्टींसाठी ओळखला जातो. पण दक्षिण अमेरिकेतल्या या देशाचं जगाच्या राजकारणातही छोटं पण अतिशय महत्त्वाचं स्थान आहे.
सोमवारीच ब्राझीलमध्ये सत्तापालट झाला आहे. अतीउजव्या विचारसरणीचे आणि काहीसे वादग्रस्त राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना हरवून डाव्या विचारसरणीचे माजी राष्ट्राध्यक्ष लुला द सिल्वा पुन्हा सत्तेत आले आहेत.